काही व्यक्तिचा जन्मच मुळात चार भिन्तीमधे रमण्यासाठि नसतो .. ती जगतात कधी मंद वाराच्या झुळूकेसारखी .... कधी झंझावाती वादळासारखी ... कधी सुं सुं गोंगाट करणाऱ्या सोसाट्या सारखी ! ... ह्या माणसांचं अस्तित्व दिसत नाही पण जाणवतं राहत क्षणोक्षणी .....वाऱ्याला का कुणी मुठीत कैद करायची वेडी आशा ठेवतं ? नसतेच ठेवायची ...त्याला हवा तेवढा , हवा तिकडे , स्वच्छंदपणे मुक्तकण्ठानं संचार करू द्यायचा असतो..... तेंव्हा कुठे जाऊन ग्रीष्मातल्या एखाद्या कडकडीत दुपारी तो तुम्हाला कुठुन तरी अवचित भेटायला येतो .. चेहऱ्यावरचा घाम सुद्धा गार वाट्याला लागतो ... डोळे आपोआप मिटतात ... ती झुळूक एका निमिषार्धात जाणीव करून देते अशी माणस जाण्यासाठी का होईना पण यावी आयुष्यात एकदा तरी ! एखादा वादळ घेऊन येतील स्वतःबरोबर , पण कड़क उन्हात दिलासा सुद्धा देतील ... अवकाळी आलेल मळभ आपल्याबरोबर दूर दूर घेवून जातील ... तुमच आभाळ अगदी निरभ्र होईल , पण ते मात्र दूर निघून गेले असतील .. अशाच एका एकट्या संध्याकाळी परत भेटण्यासाठी !
“There is no real ending. It’s just the place where you stop the story.” - Frank Herbert
Sunday, July 26, 2015
तो
काही व्यक्तिचा जन्मच मुळात चार भिन्तीमधे रमण्यासाठि नसतो .. ती जगतात कधी मंद वाराच्या झुळूकेसारखी .... कधी झंझावाती वादळासारखी ... कधी सुं सुं गोंगाट करणाऱ्या सोसाट्या सारखी ! ... ह्या माणसांचं अस्तित्व दिसत नाही पण जाणवतं राहत क्षणोक्षणी .....वाऱ्याला का कुणी मुठीत कैद करायची वेडी आशा ठेवतं ? नसतेच ठेवायची ...त्याला हवा तेवढा , हवा तिकडे , स्वच्छंदपणे मुक्तकण्ठानं संचार करू द्यायचा असतो..... तेंव्हा कुठे जाऊन ग्रीष्मातल्या एखाद्या कडकडीत दुपारी तो तुम्हाला कुठुन तरी अवचित भेटायला येतो .. चेहऱ्यावरचा घाम सुद्धा गार वाट्याला लागतो ... डोळे आपोआप मिटतात ... ती झुळूक एका निमिषार्धात जाणीव करून देते अशी माणस जाण्यासाठी का होईना पण यावी आयुष्यात एकदा तरी ! एखादा वादळ घेऊन येतील स्वतःबरोबर , पण कड़क उन्हात दिलासा सुद्धा देतील ... अवकाळी आलेल मळभ आपल्याबरोबर दूर दूर घेवून जातील ... तुमच आभाळ अगदी निरभ्र होईल , पण ते मात्र दूर निघून गेले असतील .. अशाच एका एकट्या संध्याकाळी परत भेटण्यासाठी !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment