Wednesday, November 26, 2014

लोलक

अक्षय १८ वर्षांचा मुलगा
नीरजा अक्षय ची मैत्रीण
अविनाश अक्षय चे बाबा
अमृता अक्षय ची सावत्र आई
सुमित्रा अक्षय ची biological आई
सचिन सुमित्रा चा नवरा
प्रसंग १ अक्षयच घर
अक्षय    : (phone वर) hello काकू, मी अक्षय बोलतोय. नीरु आहे का ? अच्छा , निघाली का ? Okay. नाही , तेच विचारायला phone केला होता. बाकी, तुम्ही कश्या आहात ? आमचा आभ्यास ? मस्त चाललाय. okay , हो पोचली कि कळवतो bye !

(ear phone लावतो. गाणं ऐकता ऐकता गुण गुणतोय. some इंग्लिश music rock. घराची बेल वाजते , त्याला ऐकू येत नाही , दोन तीनदा बेल वाजते .. मग अक्षय चा phone वाजतो)

अक्षय    : Hello , आग phone काय केलास , बेल नाही का वाजवायची ? ओह्ह ! Sorry! उघडतो.
नीरजा    : काय करत होतास रे ? कधीच उभी आहे मी बाहेर , मला वाटला झोपला बिपलास कि काय.
अक्षय    : झोपतोय कसला , मस्त "........" ऐकत होतो.by the way , काकुना message टाक पोचलीस म्हणून , मी call केला  होता , उगाच काळजी करतील त्या.

(नीरजा message टाकते.)

अक्षय    : मग अभ्यास सुरु करायचा कि आधी चहा टाकू ?
नीरजा    : नंतर घेऊ रे चहा. मला maths चा जाम tension येत. आणि एका जरी test ला कमी मार्क पडले न कि मग उरला सुरला confidence पण खल्लास.
अक्षय    : Tension not buddy ! मी असताना maths को डरने का नही. १०th ला पडले न .. मग १२ th ला पण पडतील मार्क्स.
नीरजा    : च्यायला , तुला काय जातंय म्हणायला , तुझा डोकं भारी चालता maths मध्ये.
अक्षय    : आणि तुझा आर्ट्स मध्ये.
नीरजा    : शप्पथ , कधी कधी असा वाटतं उगाच science घेतलं. मस्त आर्ट्स घ्याला हवा होतं. स्वच्छंद आयुष्य. Reporter वगैरे व्हायचं. कार्टून्स काढायची painting करायचं.
अक्षय    : अग , it's never too late to follow your passions , अजूनही कर कि हे सगळं. Science शिकणारे लोक काय कार्टून्स नाही काढत ? उगाच आयुष्याची वाट चुकल्यासारखं बोलू नको.
नीरजा    : योगी महाराज , आजचा उपदेश देऊन झाला असेल तर जरा प्रोब्लेम solve करायला घायचे का maths चे ? आयुष्यावर वगैरे बोलयला आपण लहान आहोत अजून.
अक्षय    : लहान ? I will be 18 next month. I will have right to vote and choose Indian government. आहेस कुठे !
नीरजा    : बर बाबा. तू जिंकलास.आपण मोठे आहोत स्वतःचे निर्णय स्वत: घेण्याइतके. तू तरी नक्कीच आहेस. बर , ते सगळं सोड. What are the plans for b'day? Aunty सांगत होत्या कि तुम्ही हिमालय ट्रेक वर जाणार आहात. काकू आज आहेत कुठे? बाहेर गेल्यात का ?
अक्षय    : ती अशी किती वेळा घरी भेटते ग ? तुला माहितच आहे कि , ती आणि तिचा social work. आज काय तर बचत गट मीटिंग , उद्या काय तर fund raiser etc.
नीरजा     : असा काय बोलतोस रे वैतागून. मी असते तुझ्या जागी तर I would have been proud of such mother. I love Amruta aunty, किती open minded, socially active, बोले तो बिनधास्त.
अक्षय    : Even I am proud of her.पण कधी कधी न ... जाऊ दे न ... काय घेवून बसलीस तू पण.
नीरजा    : अक्क्या , भांडलास वगैरे कि काय काकूंबरोबर ? बरा आहेस न ? तसा गुणी मुलगा आहेस तू ( हसते) , माझ्याशी सोडून भांडता नाहीस कुणाशी.
अक्षय    : तसा काही नाही ग. बरा आहे मी.
नीरजा    : खरंच ?
अक्षय    : stamp paper वरलिहून देऊ का ? तुम्ही पोरी पण ना , हात धुवून मागे लागता एका गोष्टीच्या. सांगितला कि बर आहे म्हणून. सारखं विचारू नको.
नीरजा    : आता तर माझी खात्री पटली. आता जरा काय झालाय ते सांगायचे उपकार करा आमच्यावर. उगाच माझं घसा कोरडा करायला लावू नको.
अक्षय    : तू reporter च हो बाई , पाठपुरावा करण रक्तात आहे. माझ्याकडून वदवून घेतल्याशिवाय जीव थंड नाही पडायचा तुझा. एवढं serious काही नाहीये गं. mumma च आपलं चाललंय सारख , birth day celebrate करायला हिमालय tour ला जावूया वगैरे. मला नाही जायच. मी फक्त तसा म्हणालो कि मला tour वर जाण्यापेक्षा इथे सगळ्यांबरोबर celebrate करायला आवडेल. तर ती लगेच माझ्यावर नाराज झाली. कस सांगू तिला मी समजावून. काही कळत नाहीये. बर मी तिला म्हणल कि birthday झाल्यावर जाऊ ट्रीप वर , तर तेही पटत नाहीये तिला.
नीरजा    : चक्क हट्ट कर. मी तर तेच करते. आई बाबा कसा त्यांच्या सोयीप्रमाण सांगतात , "असं वागायला तू काही लहान नाहीस किंवा मधे बोलू नको एवढी मोठी नाहीस." , तसं आपण पण सोयीप्रमाणे लहान मोठ व्हायचं. तू बिनधास्त हट्ट कर. मी देते tips कि sophisticated हट्ट कसा करावा , expert आहे मी.
अक्षय    : (उपहासाने हसतो) हट्ट ! ते जमला असतं तर काय. सांगून पाहिलं मी एक दोनदा. पण तिला पटतच नाहोये. तिचा म्हणणं हेच कि मित्र मैत्रिणी आहेतच पुढे कायम , आमच्याबरोबर चल.
मला माहित नाही तिला एवढा काय प्रोब्लेम आहे ते. ती नाराज आहे आणि मग त्यामुळे मला चैन पडत नाहीये. अस्वस्थ वाटतंय.
नीरजा    : तसं पाहिलं तर auntyचं पण चुकीचं नाही actually. आपण सगळे काय , तू आल्यावर celebrate करू ना. post birthday bash !
अक्षय    : वाह ! आता तू तिची बाजू घेणार आहेस का म्हणजे ?
नीरजा    : अरे अक्क्या , बाजू वगैरे नाही, बर सोड , तू बोल.
अक्षय    : तिनं मला काही न सांगताच प्लान केला , surprize म्हणून. पण आमच्या धाकट्या भगिनी पचकल्या चुकून आणि surprise फूस.
नीरजा    : ohh!
अक्षय    : मला नाही ग जायचंय. (pause).
आणि netwrok नसतं न तिकडे. आईचा phone येतो दर वर्षी माझ्या वाढदिवसाला. यावर्षी पण येईल. म्हणजे एखाद्या वर्षी नाही आला तर फार फरक पडेल अस नाही पण तरीही.
नीरजा    : विसरलेच कि मी. कश्या आहेत सुमित्रा aunty ?
अक्षय    : कुणास ठाऊक .. असेल बरी ... माहित नाही मला.
नीरजा    : last time कधी बोलणं झाला होतं ?
अक्षय    : phone आला होता दिवाळीला. पण जास्त काही बोललो नाही किंवा बोलता आल नाही. मला न कळतच नाही काय बोलायचं तिच्याशी. General hi hello आणि long pauses मधे १०-१५ मिनिट कशी निघून जातात काय माहित.
नीरजा    : तू birth day बद्दल काकांशी का नाही बोलत ?
अक्षय    : बाबाशी ? वेड लागलंय का नीरु? त्याला सुमित्रा आई चा विषय सोड नावसुद्धा काढलेल आवडत नाही, I know he still hates her. मला आता details आठवत नाहीत फारसे, पण divorce फार अवघड गेला असावा त्याला. मला तर कधी कधी अस वाटतं maybe I also hate her a little.
नीरजा    : hate? अक्क्या , hate फार मोठा शब्द आहे.
अक्षय    : It is complicated than you think. द्वेष , राग , घृणा , संताप , कीव , मत्सर या सगळ्यामध्ये अगदी अस्पष्ट रेषा असते , कधी पार होते कळत नाही कधी कधी.
Besides I am very happy with family I have. Mumma, Baba आणि अनुजा! I am very lucky to have mumma and अनुजा in my life.
नीरजा    : True! ऐक ना , आपण जरा प्रदूषणाला हातभार लावूयात ?
अक्षय    : हे काय tangent ?
नीरजा    : tagent नाही रे , lets contribute to global warming. मग हिमालय वितळेल आणि ट्रीप cancel.
अक्षय    : वाईट होता. अत्यंत पाणचट.
नीरजा    : I am proud of myself. (Collar ताठ.)
अक्षय    : चल , मी चहा टाकतो , तू प्रोब्लेम घे solve करायला ( आत जातो)
नीरजा    : problem is complicated , पण मिळेल solution.



प्रसंग २ : अक्षय चा घर

(अविनाश घरी येतो , दार उघडतो. laptop bag ठेवतो. पाणी पितो. गाणं गुणगुणतो)

अक्षय    : बाबा , तू कधी आलास ?
अविनाश  : अरे , तू घरी आहेस होय. आज मित्रांचा अड्डा सोडून चक्क घरी ?
अक्षय    : बाबा , विसरलास काय रे , माझी exam आहे पुढच्या आठवड्यात.
अविनाश  : हो कि , विसारोच बघ कामाच्या नादात. These deadlines and meetings are killing me. मग अभ्यास
कसा चालू आहे ?
अक्षय    : जोरदार.
अविनाश  : अरे अक्षय जरा enjoy कर कि. ११विला कोण एवढा अभ्यास करतं. हेच दिवस असतात रे. मोठा झाला कि असं होतं माझ्यासारखं , जगण्यासाठी कमवायचा का कमवण्यासाठी जगायचं हे कोडं सोडवायला सुद्धा वेळ मिळत नाही.
अक्षय    : तुझ आपल काहीतरी वेगळच हं बाबा, इकडे माझे friends ओरडा खातात अभ्यासासाठी.
अविनाश  : अरे मला माहित नाही का , मी नको म्हणालो तरी तू अभ्यास करशील. Mumma चा गुणी मुलगा आहेस तू. She has done such a good job with you. Disciplined, studious, all rounder आणि अजिबात हट्ट न करणारा मुलगा. नाहीतर हि अनुजा , शाळेला दांडी मारायचे आणि आम्हाला emotional blackmail करण्याचे १०१ मार्ग - यावर पुस्तक लिहील एक.
अक्षय    : अरे लहान आहे ती. आणि परीक्षा विसरलास म्हणून एवढा कौतुक नको काही.
अविनाश  : ती लहान आणि तू काय मोठा का ? But really , mumma सारखं जमलं नसतं मला. बर आहे कुठे ती ? कधी येतीये काही बोलली का?
अक्षय    :तिचा माहिती आहे न तुला ? ७ ला येते म्हणाली होती , exact ७ ला येईल. अजून ३ मिनिट आहेत.
ती न indian military मधे हवी होती , चांगली वरच्या हुद्द्यावर गेली असती , उगाच हे social work मध्ये पडली.
अविनाश  : (थोडसं रागाने) अक्षय ! ती शिस्तीची आहे न म्हणून चाललंय घर व्यवस्थित. God knows how I would have managed without her.
अमृता    : (हसते) बाप लेकाच्या काय गुजगोष्टी चालू आहेत? माझ्या तक्रारी सांगतोय का अक्षय कि सावत्र आई कशी छळते ते.
अविनाश  : आजपर्यंत एकही तक्रार नाही. तुझं रेकॉर्ड एकदम clean आहे. तुझ कौतुक करत होतो आम्ही, हो न अक्षय ?
अक्षय    : हो , बाबा कौतुक करत होता.
अमृता    : आयता चहा हवा असेल त्याला , दुसरा काय. (आत जाते ओरडून विचारते) अक्षय आज दुध न पिता चहा केलेला दिसतोय.
अक्षय    : नाही , नीरु आली होती अभ्यासाला तिच्यासाठी केला होता एक cup. बाबा, मी जरा जाऊन येतो कट्टयावर.
अमृता    : अभ्यास झालाय का अक्षय ? Next वीक exam आहे न ? चांगले मार्क्स हवेत , ११ आहे म्हणून lightly नको.
अक्षय    : झालाय.
अमृता    : आणि वाशिंग machine लावलं का ? आज तुझा turn होता.
अक्षय    : Mumma , आजपर्यंत चुकवला आहे का कधी मी turn. झालंय लावून.
(अक्षय जातो अमृता चहा घेऊन येते)
अमृता    : अवि , बोललास का रे त्याच्याशी ट्रीप बद्दल ?
अविनाश  : नाही अजून , बोलतो सावकाश.
अमृता    : आजच बोल न.
अविनाश  : बर
अमृता    : बाकी काही नाही रे , माझ्या ट्रेक मधले सगळे excited आहेत एकदम , we cannot cancel it now.
अविनाश  :तू अक्षय ला आज ओळखतेस का अमृता, तो येईल. मला उगाच त्याला pressurize नको करायला लावू. He will come around by himself.
अमृता    : I hope so. मला तो नाही म्हणेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नाही.
अविनाश  : hmm
अमृता    : मला ते सगळं सुमित्रा प्रकरण avoid करायचं होता या वर्षी. म्हणून मी एवढ्या घाईने प्लान बनवला.
तो १८ वर्षांचा होईल , या वेळी आपण तिला अडवू शकत नाही कायद्याने. आणि अक्षय ने कुणाला कधी आणि किती वेळा भेटायचं यावर तसा आपला हक्क नाही आता.
मला त्याचा १२विचा महत्वाचा वर्ष अस emotional dilemma मध्ये अजिबात वाया घालवायचं नाहीये.
अविनाश  : हे बघ , त्याला खर कोण - खोट कोण , चूक - बरोबर सगळं कळत. Balanced विचार करतो तो. trust me , तो नाही जाणार तिला भेटायला.
अमृता    : I hope so. मी किती झटलिये त्याच्यासाठी ह्याची जाणीव आहे त्याला. तू म्हणतोस तसं तो तिला भेटायला नाही जाणार ( pause) .. कदाचित.
अविनाश  : {pause} come on अमृता , let's not be so insecure , we both knew this was coming someday. आपण किती वेळा बोललोय या topic वर.
अमृता    : hmmm, I can't bear the thought of him going away from me.
अविनाश  : अग तो एकदा भेटायला गेला तरी काय सोडून जाणार आहे का आपल्याला , काहीही काय बोलतेस तू. मला सुमित्रा चा किती राग आहे माहितीये तुला. तिने मला आणि अक्षय जे घाव दिलेत इतके वर्ष , ते काय असे एका भेटीत पुसले जातील का. पण ती सोडून गेली हे बरच झालं एकार्थी , तू आणि अनुजा कश्या आला असता आमच्या आयुष्यात नाहीतर ?
अमृता: अनुजाच बर आहे. तिने खऱ्या बाबाला पहिलाच नाहीये. त्याने पाठ फिरवली ती कायमचीच. तिचा पहिल्यापसून तूच बाबा आहेस. तिची बाबाची कल्पना तुझ्यापासून सुरु होते आणि तुझ्यावरच संपते. अक्षय चा तसा नाही , सुमित्राच्या सुखद आठवणी आहेत त्याच्याकडे.
अक्षय    : आणि ती सोडून गेली याचा आघात पण आहे. आपणच घेवून जायचो न त्याला मानसोपचार तज्ञाकडे. किती महीने लागले त्याला हे सगळं adjust करायला. तो तिला स्वतःहून भेटायला नाही म्हणायचा , phone वर नाही बोलायचा , ओरडायचा , अजूनही मोजकच बोलतो तो तिच्याशी , अगदी परक्यासारख.
अमृता    : She will mess up our happy little family.
अविनाश  : तू अतिविचार करत आहेस अमु. (काळजीने and शंकेने , स्वतःला समजवत) , Everything will be fine. it has to be.
अमृता    : मला अतिविचार करायची सवय लागलीये किंवा लावून घेतलीये म्हण. आयुष्य सरळ रेषेत चाललं असतं तर कशाला एवढा विचार केला असता. पावलोपावली परीक्षा द्यायचा कंटाळा आलाय रे.
अविनाश  : अमु , तुझ्याशिवाय कोणावरही अक्षय ची आई बनण्याची जबाबदारी टाकण्याची कल्पना पण करवत नाही मला. सरळ रेषेत चालतानाही एवढा आनंदी नव्हतो तेवढा आनंदी आहे मी आत्ता.
अमृता    : सगळं खरय रे. पण शेवटी जोडलेल्या नात्यांबरोबर warrenty card येत नाही. सुमित्रा ने त्याला काहीबाहीसांगितला आणि अक्षय चा विश्वास बसला तर ? तू बोलत का नाहीस सरळ त्याच्याशी ? सुमित्राचा स्वार्थीपणा कळू दे न त्याला एकदा , पोटच पोर कसा वाऱ्यावर सोडून गेली ते. मोठा झालाय तो , खर जाणण्याचा अधिकार आहे त्याचा.
अविनाश  : त्याचा अभ्यास करून स्वप्न पहायचं , खेळायचं वय आहे. लहानपण तर वाया गेलच या सगळ्या नादात , निदान हि independent व्हायची phase तरी enjoy करू दे त्याला. प्रेमाची ओळख व्हायच्या आधीच त्याचा मन कलुषित करू वास्तव सांगून. फार क्रूर आहे गं ते. आणि सांगू तरी काय. माझ्या अयशस्वी प्रेमविवाहाची कहाणी ? दर वेळी त्या घटनांची उजळणी करताना नवीन गोष्ट सापडते , वाटतं इथे मी वेगळा वागलो असतो तर ? इथे सुमित्रा ने थोडा समजूतदार पणा दाखवला असतं तर ? प्रेम आंधळ असतं हे आम्हाला कळण्याची फार मोठी किंमत मोजली माझ्या लेकरान. मी आणि सुमित्रा प्रेमात होतो , लहान होती ती माझ्यापेक्षा ८ एक वर्षांनी - creative , adventurous , enthusiastic , modern आणि काहीशी अल्लड. त्याच सगळ्या गोष्टीवर फिदा होतो मी तिच्या. Opposites attract असली equation किती फोल असतात ते कळत नवतं. मी एकदम matured , engineer , हुशार , थोडा aggressive आणि चिडका. ती एकदम impress झाली होती. तिच्या मैत्रिणी हैराण होत्या तिच्या choice वर. माझे orthodox आई बाबा माझ्या choice वर. पण रीतसर लग्न आणि मग रीतसर अक्षय हि झाला. तिचा career चा जम बसत नव्हता कारण तशी तो लहान होती आणि मला तिने अक्षय ला priority द्यावी अशी साधी अपेक्षा होती. माझ्या आवडणाऱ्या स्वभावाचा तिला नंतर एवढा त्रास आणि कटकट होईल असा वाटलाच नव्हतं. आमच्यातली भांडणं आणि मतभेद एवढ्या टोकाला कधी गेले कळलंच नाही मला. माझी लग्नाची बायको - माझ्या मुलाची आई दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडेपर्यंत दूर कधी गेली हे न कळणं म्हणजे कहर होता मूर्खपणाचा. काय सांगू मी अमु त्याला , कि त्याचा बाप किती शुद्ध मूर्ख होता ? कि त्याची आई एक दिवस उठली , सामान गोळा केलं आणि निघून गेली मागचा पुढचा विचार न करता ?

अमृता    : sorry रे अवि. मी नकोच होता हा topic काढायला. तुला किती त्रास होतो माहित नाही का मला. माझं तरी काय भूतकाळ विसरायला म्हणून social work मध्ये गुरफटवून घ्यायचं स्वतःला आणि त्यातून वेळ मिळाला कि अक्षय आणि अनुजा ची काळजी. आईपण विचित्र असतं , सोडायचं म्हणलं तरी सुटत नाही. सुमित्राचा राग येण्यापेक्षा कीव येते मला.
अविनाश: ती तिच्या संसारात आहे न सुखी. आपण हि यातून बाहेर पडू. इतक्या गोष्टीना एकत्र सामोरे गेलोय. त्यात अजून एक. अक्षय ला फक्त जपायला हव.

(दोघेही वेगळ्या दिशेकडे बघत आहेत पण अमृताचा हात अविनाश च्या खांद्यावर आहे).


प्रसंग ३ : सुमित्रा चे घर

(सुमित्रा फोन वर आहे)
सुमित्रा    : सचिन , अरे किती ला निघणार आहेस ? कधीची बघतीये मी phone ची. अन्वित ने तिकडे आजी ला हैराण केलाय बाबा कधी येणार विचारून. बर ऐक , येताना अर्धा लिटर दूध आण. (पसारा आवरते)
काय हा पसारा , किती ही आवरा , बाप लेक मिळून पुन्हा पसरवतील.

(आवरताना purse उचलते आणि अक्षय चा फोटो खाली पडतो , उचलते. शांत पणे कोचावर बसते. मागे डोकं टेकते आणि डोळे
मिंटते. थोड्या वेळाने सचिन latch उघडून आत येतो. सुमित्रा कडे बघतो. फोटो कडे बघतो. हालचाल होते. सुमित्रा डोळे उघडते.)

सुमित्रा    : अरे आलास तू ? दूध आणलास ? अन्वित कुठे आहे.माझं डोळा कधी लागला कळलंच नाही.
सचिन    : आजीबरोबर आहे. खाली खेळतोय. तुला झोप लागली होती खरंच ?
सुमित्रा    : (वाक्य अर्ध तोडते , तिला विषय avoid करायचं आहे). हो रे. जरा दमले आहे आज. ( कोचावरून उठते)
सचिन    : अक्षय ची आठवण येतीये का ?
सुमित्रा    : आठवण काढायशिवाय केलाय काय मी त्याची आई म्हणून.
सचिन    : सुमा , आपण किती वेळा बोललोय या विषयावर. अपराधीपणाची भावनाकाढून टाक मनातून. तुला त्या क्षणी जे योग्य वाटल तेच तू केलस.
सुमित्रा    : कुणासाठी योग्य ? अक्षय साठी ? का माझ्यासाठी? अश्या संपतात का गोष्टी संपवायच्या म्हणून. एक बोळा घेवून पाटीवरून सगळं पुसून टाकण्या इतका सोप्पं आहे का ते ? अन्वित आल्यावर mumma म्हणून जी घट्ट मिठी मारतो न मला , ती विसरणं जितका अशक्य न तितकंच अक्षयचा आवाज ऐकण्यासाठीची ओढ. मला वाटला होता रे कि सगळ ठीक होईल. काल सगल्यावरचा औषध असतो. हे घाव सुधा भरून निघतील. पण जसजसा अक्षय चा १८ वा वाढदिवस जवळ येतोय न , तस माझं मन मला आतल्याआत खातंय.... ज्या दिवशी त्याची custody अविनाश ला दिली न , त्या दिवशी वाटलं .. Exactly तसच. इतके दिवस court order ला बांधील होते , आता ...
सचिन    : (हातातून फोटो काढून घेतो , purse ,मध्ये टाकतो) , तू phone का नाही करत अक्षय ला ? मी सांगू का अविनाश ला ? अग तुझा हक्क आहे.
सुमित्रा    : हक्क आणि कर्तव्य या सगळ्याच्या पार पलीकडे पोचवलंय परिस्थितीने मला. आणि phone झालाय माझा. ते सगळे tour वर चाललेत. कदाचित 'तिकडे coverage नसेल' म्हणाला , 'phone नाही लागला तर गैरसमज करून घेवू नको'.
अक्षय आनंदी आहे तिकडे. त्याच्या celebration मधे नको आडकाठी माझी. ते आले कि करेन phone.
(बेल वाजते)
सुमित्रा    : अक्षय आला वाटतं , भूक भूक म्हणून आरडओरडा करेल आता. (तिला लक्षात येत नाही कि ती चुकून अक्षय म्हणाली अन्वित च्या ऐवजी , ती आत जाते)
सचिन  : (पसारा आवरायला घेतो , purse उचलतो ) अक्षय नाही , अन्वित ... अन्वित.


प्रसंग ४ : अक्षयच घर
अक्षय    (phone) नीरु , घरी येतेस का ? बोलायचं आहे महत्वाच. busy ? Exam संपल्यावर काय busy? Okay, भेटू मग.
(नीरजा येते.)
अक्षय    : बस. मस्त कॉल्ड coffee करतो.
नीरजा    : (चिडते) अरे आधी संग तरी काय झालंय. पूर्ण रस्ताभर मी अंदाज बांधत आलीये काय प्रोब्लेम असेल त्याचा , काही तुझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडच्या आहेत. ते सोड्याची बाटली हलवल्यावर झाकणावर कसा pressure येत , तस काहीस.
अक्षय    : अग हो , बस तरी आधी. काल बाबाला phone आला होता. बहुतेक आईचा होता.
नीरजा    : सुमित्रा aunty?
अक्षय    : Hmmm.तिला बहुतेक मला भेटायचा होत. बाबाने as usual उडवाउडवीची उत्तर दिली. tour ला चाललोय वगैरे.
नीरजा    : मग?
अक्षय    : मग काही नाही. बाबा टाळाटाळ करतो आणि ती पण फार काही पाठपुरावा नाही करत एरवी.
नीरजा    : या वेळी ?]
अक्षय    : यावेळी सुधा काही फार लावून धरला नसावं.
नीरजा    : मग , तुला भेटायचं आहे का त्यांना ?
अक्षय    : माहित नाही.
नीरजा    : अरे , uncle न सांगून बघ ना. अक्क्या , तुला त्यांना भेटायची इच्छा असणं यात काहीच गैर नाही. तुझी इच्छा असेल तर भेट.
अक्षय    : आणि तिलाच मला भेटायची इच्छा नसेल तर ? mumma बाबाच्या बोलण्यावरून ती माझ्याकडे एक liability म्हणून पाहते असाच मला वाटत आलाय.
नीरजा    : पण दर वेळी mumma बाबांच्या चष्म्यातून पाहू नको. स्वतःच ठोकताळे बांधत बसण्यापेक्षा , त्या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न का नाही करत ? भेट त्यांना आणि सरळ सरळ विचार.
अक्षय    : मला थोडीशी भीती वाटतीये. मनासारखी उत्तर नाही मिळाली तर ? पुढे काय ? काही वेळा प्रश्न अनुत्तरीत राहू देणच चांगलं.
नीरजा    : चांगल कि सोप्पं ?
अक्षय    : हे confusion सगळ्यात वाईट. ना धड आकाशात उडावं ना धड जमिनीवर पाय टेकावेत. सगळंच अधांतरी.
नीरजा    : आयुष्यभर भ्रमान राहण्यापेक्षा , वास्तवाचा सामना करण अवघड असेल कदाचित. But let's hope ki it will be all worth it.
नीरजा    : मग , काकाशी बोलतोस का ?
अक्षय    : बाबा चिडेल. mumma ला पण नाही चालणार. तुला आठवतं का माझा ७ वी स्कॉलरशिप ला नंबर आला होता.
नीरजा    : न आठवायला काय झालं. केवढी मोठी पार्टी दिली होती काकांनी , कौतुक सोहळा.
अक्षय    : त्या दिवशी अचानक paper मध्ये नाव वाचून ती आली होती. ( आई म्हणून उल्लेख टाळतो). अभिनंदन करायला. मी mumma बाबा आणि अनु बाहेर चाललो होती जेवायला. ती एक छानसं wrist watch घेवून आली होती. बाबाला आवडला नाही , त्याने तिला आत घेतलं नाही. तोच बाहेर गेला. मी लक्ष नसल्यासारख दाखवल.
ती ५ मिनिट मागत होती अभिनंदन करण्यासाठी , बाबांन साफ नकार दिला , court order नुसार पुढच्या महिन्यात भेटायला मिळणार होता तिला.
लहानपणी सोडून गेलीस त्या निष्पाप पोराला , तेंवा कुठ गेला होता तुझा माया प्रेम आणि कौतुक. ती तरीही निर्लज्जपणे बाबाला विनवत राहिली , तेव्हां कुठे त्यांना घड्याळ घेतलं. घड्याळ ठेवण्यासाठी त्यानं drawer उघडला , आणि काय वाटला कुणास ठाउक , त्यांना मला ते घड्याळ आणून दिला. मला आईचा खूप राग आला होता. काय अधिकार होता तिला माझिया आई म्हणवून घ्यायचा आणि कौतुक करायचा. mumma किती करायची माझं.
मला ते घड्याळ वादाला होता , पण मी ते घातला आणि बाबा माझ्यावर चिडून मला सोडून गेला तर , या विचारात ते घड्याळ मी फेकून दिला जमिनीवर.एरवी बाबाने मला जबर शिक्षा केली असती , पण त्याक्षणी मला त्याच्या डोळ्यात समाधान दिसलं , काहीतरी जिंकल्याच. मला त्याने घट्ट मिठी मारली , आणि बाबा मला सोडून जाणार नाही याची मला तात्पुरती का होइना पण खात्री पटली.
नीरजा    : अक्षय अरे .....
अक्षय    : तिचा आणि बाबाच कधी काळी एकमेकांवर प्रेम होता हा विचार सुद्धा मजेशीर वाटतो मला. दोन टोकाचा प्रेम करणारी माणस असा टोकाचा द्वेष करू शकतात का ग ? जर मी तिच्याकडे असतो तर , तिने मला बाबा[पासून असाच दूर ठेवला असतं ?
नीरजा    : जर तर च्या विचारणा फार थारा देऊ नये. त्या "जर" ची वेळ कधी येत नाही आणि "तर" कधी घडत नाही. आत्ता बाबा आहे न तुअझ्यासोबत तोच क्षण खरा. बाकी सगळे मांचे अबलक घोडे... स्वैर उधळणारे.
अक्षय    : mumma च्या कष्टाचा आणि प्रेमाचा पमान नाही करायचं मला. तिने खूप केलाय माझं
नीरजा    : असा बोलू नको अक्षय. आई कधी उपकार नाही करत मुलांवर , मग ती आई असो किवा सावत्र आई असो. बाबा सांगतात मला गमतीने. एक बाई जेंव्हा कुणाची बहीण , मुलगी, बायको , मैत्रीण असते , तेंवा तिला गृहीत धरलेलं अजिबात आवडत नाही तिला , पण एकदा का ती कुणाची आई झाली कि मग मुलांनी तिला नेहमी गृहीत धरावं , हक्काने चार गोष्टी मागाव्यात आणि आपली गरज नेहमीच त्यांना भासावी हीच अपेक्षा ठेवून ती जगते.
अक्षय    : मी mumma ला काय पण बाबाला ला सुद्धा taken फ्रोम granted घेतलेलं नाही आज पर्यंत. लहानपणी मी चुकलो तर ते मला सोडून जातील याची भीती आणि मग नंतर सवय झाली त्या भीतीची पण. Good Boy ची चौकट चिकटली ती कायमची ...
नीरजा    : आणि आता सुमित्रा aunty ला भेटण्याने ती मोडेल ?
अक्षय    : निदान mumma बाब्च्या नजरेत तरी.
नीरजा    : सुंजाता aunty चा गुन्हा काही एवढा मोठा नाही कि तू त्यांना एकदा त्यांची बाजू मांडायला देऊ नयेस. कदाचित त्या चुकाल्याही असतील किंवा त्यांना पश्चताप हि झालं असेल वेळ निघून गेल्यावर. आयुष्यात किती तरी निर्णय केवळ नाईलाजपोटी घ्यावे लागतात.
अक्षय    : पटतंय मला. काय ते एकदा भेटून विचारतो. तू येशील माझ्याबरोबर ?
नीरजा    : आले असते रे पण
अक्षय    : तुला य महितोये फक्त तुझ्याशी मी एवढा मोकळेपणानी बोलतो , चल न
नीरजा    : अरे awkward होईल सुमित्रा aunty ना
अक्षय    : एवढ्या वर्षात तिच्याशीधड बोललो नाहीये , आमच्या दोन अनोळखी लोकांच्या भेटीत तुझ्यामुळे already असलेल्या awkward वातावरणात फार फरक नाही पडणार. माझ्यासाठी चल.
नीरजा    : बर बर , ( to lighten the mood she laughs ) आता सेंटी नको मारू .. येते मी.
अक्षय    : I hope बाबा जास्त चिडणार नाही.
नीरजा    : chill रे अक्क्या, बाबा लोक जास्त वेळ; चिडत नाही. माझे बाबा मला सारखे सांगतात , मला राग येईल असा काही करू नको नीरु , तुझ्यावर चिडणं हि माझी मला केलेली शिक्षा असते.
They always come around, even when the whole world turns their back on you , they "always" do.
अक्षय    : Do you think all "three" of them will , will she ?
नीरजा  : we need to find out.



प्रसंग ५ : सुमित्रा dairy लिहीतोये

आज मी खूप आनंदात आहे , किती दिवसांनी अक्षय चा आवाज ऐकला. त्याला माझ्याशी बोलना अजूनही अवघड जातंय. पण त्याचा दोष नाही. मला गम्मत वाटली दोन मिनिटे जेंव्हा त्यांना मला विचारलं कि " वेळ आहे का तुला भेटायला ? free आहेस का तू Weekend ला?" स्वतःचा मुलगा अशी परक्यासारखी भेटायची वेळ मागतोय. अन्वित किती हक्काने करून घेतो सगळं माझ्याकडून. खरय म्हणा , अन्वित वर जसा हक्क गाजवते तसा अक्षय वर कधी गाजवला. त्याचे सगळे हक्क अविनाश ला देऊन टाकले , आणि कर्तव्य सुद्धा. मी त्याला म्हणाल तुअझ्यासाठी मला नेहमी वेळ आहे , त्यावर काही बोलला नाही तो. काय चाललंय त्या पोराच्या मनात कुणास ठाउक. इतके वर्ष माझ्याशी phone वर बोलायला सुद्धा तयार नसणारा अक्षय आज अचानक भेटायचं म्हणतो आहे. I hope मला पुन्हा कधी भेटू नको असा सांगणार नाही... अविनाश आणि अमृता ने तर सांगितला नसेल त्याला भेटून सांगायला?

तो आल्यावर काय सांगू त्याला ? सगळं खरं सांगितलं तर पटेल त्याला ? अविनाश त्याच विश्व आहे , त्यांच्याबद्दल अक्षयचं मन कलुषित न करता सांगता येईल मला सत्य , असं अर्धमुर्ध सत्य ऐकेल तो ? अविनाश वागलाच होता तसं. त्याच्या आयुष्यात त्याच्या मुलाची आई सोडून काय स्थान होत मला ? मी कायमच लहान आणि त्याच्यापेक्षा कमी हुशार राहणार होते. त्याचं career माझ्यापेक्षा नेहमीच settled राहणार होत. पण म्हणून काय मी स्वप्नं पाहणं बंद करणार होते का ? अक्षय वरचं माझं प्रेम फक्त त्यागातून सिद्ध होणार होता का ? असे एक न अनेक प्रश्न सोडवायला मदत करण तर दूरच पण त्या प्रश्नाची immature म्हणून खिल्ली उडवायला हि कमी नाही केला त्याने. अक्षय झाल्यावर आई म्हणून नव्याने ओळख झाली मला माझी. पण मग माझी त्यापलीकडे ओळख असावी हि एवढी साधी अपेक्षा जर अविनाश ला कळाली नाही तर कसलं प्रेम ? बर भावनिक संवाद संपला तरी त्याला बायको हवीच होती चार भिंतीच्या आत. किळस वाटायला लागली होती मला सगळ्याची. घुसमट झाली होती असह्य. सहा महिने फक्त या आशेवर काढले कि मी ज्याच्या प्रेमात पडले तो फक्त एकदा डोळ्यात पाहून विश्वास देईल कि मी आहे , तू बाहेर पड , स्वप्न बघ आणि मी इतेच असेन तुझ्या शेजारी.

         तो दिवस आला असता तर कदाचित आज अक्षय असं परक्यासारखं बोलला नसता माझ्याशी.


प्रसंग ६ : अक्षय चा घर

अक्षय    : बाबा , mumma मला जरा बोलायचं होता
अविनाश  : अरे सांग कि मग , एवढा कसला संकोच
अमृता    : ट्रीप cancel करा सांगायचा असेल त्याला , हो न ?
अविनाश  : काय रे , खर का ?
अमृता    : मी किती उत्साहाने प्लान केलाय सगळं. अनु पण excited आहे. आणि काय नाही नाही चाललं आहे तुझा ?
अक्षय    : मी बोलू का , मला कुणाच्याही कष्टावर पाणी फिरवायचं नाहीये आणि तो माझं स्वभाव नाही हे माहित आहे तुम्हाला.
अविनाश  : तेच न , मग यावेळीच कुठे माशी शिंकली?
अक्षय    (pause) मला आईला भेटायच आहे.
अविनाश  : डोकं ठिकाणावर आहे न तुझ ?
अमृता    : अविनाश , शांत राहा.
अक्षय    : शांत ? मी हि अपेक्षा केली नव्हती याच्याकडून. सुमित्राला , ohh sorry , "आई"ला भेटायचा आहे तुला ?
अमृता    : अक्षय, मी नेहमीच स्पष्ट बोलते. तिला भेटल्यावर , ती तुझी माफी मागेल , मागचा सगळं विसरायला सांगेल आणि सगळं काही ठीक होईल अस वाटतंय का तुला ? लहान आहेस तू अजून. बाहेरच्या जग आत्ता कुठे बघयला लागशील तू. आमच्या protection मध्ये वाढला आहेस तू. जगात सगळी माणस आपल्याला वाटतात तशी नसतात. तुला ठेच लागू नये एवढीच इच्छा आहे आमची.
अविनाश  : आणि आता तुला एवढा तर माहीतच आहे कि तू सज्ञान झालास कि तुला माझ्या परवानगीची गरज नाही. तू मोकळा आहेस आहेस हवं ते करायला. मग थोडक्यासाठी हा permission चा drama कशाला.
(phone देतो)
यात received call logs मध्ये तिचा number असेल.
अमृता    : अरे पण अविनाश , त्याचा महत्वाचा वर्ष आहे १२ विचा पुढे. तो हट्टी नाहीये. तू जरा शांत पणे समाजाव त्याला.
अक्षय    : mumma , मला तुम्हाला नाराज करून काही नाही करायचं आहे. तूच सांग ना ग बाबाला. तूच convince करू शकशील त्याला.
अविनाश  : माझं आणि तिच बोलणं झालय already. आम्हाला दोघानाही तू तिला भेटावसं वाटत नाही. ती केवळ माझी बायको म्हणून अपयशी ठरली असती तर ठीक होतं , but she is a failure even as your mother! त्यातून तुला जायचंच असेल तर जा , माझ्याकडून तुझा १८ व्या वाढदिवसाच गिफ्ट समज.
(अक्षय जातो)
अमृता    : काय रे एवढा emotional होवून परवानगी दिलीस. मी समजावत होते त्याला बरोबर.
अविनाश : अमु , विषय संपव आता. माझं डोकं दुखतंय.




प्रसंग : सुमित्राच घर

अक्षय    : बेल वाजवतो
सुमित्रा    : ये ना. ( पाहते – smiles ) , केवढा मोठा झाला आहेस. ये , आत ये , बस.
अक्षय    : हि माझी मैत्रीण नीरजा , I hope you dont mind.
सुमित्रा    : अरे मला कल्पना नव्हती कोणी बरोबर येईल म्हणून , हरकत नाही. ये न तू पण.
नीरजा    : तुम्हाला awkward होत असेल तर मी अक्षय ला pick करायला येईन नंतर.
सुमित्रा    : अग तसा काही नाही. तू जवळची मैत्रीण असल्याशिवाय तुला घेवून आला नसला तो.
(awkward silence)
अक्षय    : (अस्वस्थ)
सुमित्रा    : मग कसा काय चालू आहे अभ्यास तुमचा ? सुट्टी चे काय प्लान. १२विचे क्लास लगेच सुरु होतील का ?
अक्षय    : birthday साठी हिमालय tour बुक केलीये mumma ने.
सुमित्रा    : मस्त. तुला आवड आहे का trekking ची ?
अक्षय    : (गप्प)
नीरजा    : त्याला rock music ची आवड आहे , छान guitar वाजवतो आणि गाणं पण छान म्हणतो.
सुमित्रा    : smiles
नीरजा    : तुमच्याकडे जी guitar आहे ती ?
सुमित्रा    : मला गाण्याची आवड होती , सध्या हे नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न चालू आहे.
अक्षय    : बाबा ला पण आवड आहे गाणी ऐकायची.
सुमित्रा    : हो. अविनाश खूप ऐकतो , सगळ्या प्रकारचा , त्यावरूनच तर आमचे सूर .... आमची ओळख झाली.
(पुन्हा awkward silence)
नीरजा    : तुम्ही जोब करता का ?
सुमित्रा    : हो , ग्राफिक designing , free lancing.
नीरजा    : Creative!
सुमित्रा    : अक्षय तर हुशार आहे त्याच्या बाबासारखा , engineer होईल. हो ना ?
अक्षय    : सध्या तरी तोच विचार आहे.
सुमित्रा    : Academically you are so strong , I am really proud of you.
अक्षय    : (अचानकपणे) तू मला सोडून का गेलीस ?
नीरजा    : अक्षय अरे अस ....
सुमित्रा    : थांब नीरजा , विचारू दे त्याला.या प्रश्नांची उजळणी केली ११ वर्ष केली आहे मी.
अक्षय    : I am listening ...
सुमित्रा    : मी जे केल ते योग्य होता आणि तुझ्या च्नागाल्यासाठी केला असा आत्ता मी ठामपणे नाही सांगू शकत. तेंवा मात्र मला खात्री होती त्याची. मी बाबा ला का सडून गेले ते कदाचित तुला समजावून नाही सांगू शकणार. आमचे स्वभाव जुळत नव्हते असा नाही , पण माझ्या त्याच्याकडून एक नवरा म्हणून , माझं जवळचा मित्र म्हणून काही अपेक्षा होत्या, त्याच्याही होत्या. त्या पूर्ण होत नव्हत्या. दोघांमधला अंतर दिवसेंदिवस वाढत होत.
अविनाश किती workaholic आहे तुला माहित असेलच , त्यात माझं नवीन जोब night शिफ्ट चा होता. आम्हाला दोघांना धड बोलयलाहि वेळ नाही मिळायचा एकमेकांशी. मग ते अंतर कधी कमी झाला नाही , थोड्या काळाने मी पण हार मानली आणि अविनाश ने पण.तुझ्याकडे लक्ष देण दोघानाही जमत नव्हतं. माझी इच्छा असून माझ्या कडे इलाज नव्हता.
सगळी भिस्त आजी आजोबांवर होती. त्यांनी मला कशी accept नाही केला विशेष आमच्या लोवे marriage मुळे , पण तुंझ्यावर त्यांचा जीवापाड प्रेम होत , विशेषतः आजोबांच.
अक्षय    : बाबाने मला एकदा सांगितला होता कि तुझा affair होत , sorry , I mean प्रेम होतं कुणावर तरी.
सुमित्रा    : ( हसते हताशपणे) खर आहे ते. मी आणि बाबा वेगळ व्हायच्या आधी १-२ महिने मला सचिन भेटले.
अक्षय    : आणि मग तो मला आणि बाबाला सोडून जायचा निर्णय घेतलास.
सुमित्रा    : अक्षय , अरे आयुष्य म्हणजे काही बुद्धीबळ नाही. समोरच्याची चाल ओळखून आपली चाल खेळायला आणि वार करायला. आयुष्य सापशिडी सारखा असतं.आपणच आपलंदान टाकायचा आणि वाट पहायची कि पुढे कधी जाता येतंय. म्हणल तर सगळं काही आपल्या हातात , म्हणल तर काहीच नाही.
मी आणि अविनाश आयुष्याच्या दोन वेगळ्या वेगळ्या वळणावर उभे होतो जिथून एकमेकांना भेटणं काय पण पाहणं सुद्धा अशक्य होत. सचिन चा त्या निर्णयाशी काही सम्बन्ध नव्हतं , पण ते अविनाश लाच काय पण मला सोडून कुणालाही पटलेलं नाही आजपर्यंत.
अक्षय    : (कडवटपणे) बाबाला का सोडून गेलीस हे कदाचित मला समजणार नाही , समजून घ्यायचा हि नाही , पण मला का सोडून गेलीस ?
नीरजा    : अरे अक्षय , असा आरोपीच्या पिंजर्यात उभा करून विचारल्यासारखे काय प्रश्न विचारतो आहेस.
सुमित्रा    : त्याचा हक्क आहे तो नीरजा , मी आहे त्याची आरोपी. त्याला उत्तर देता देता कदाचित माझी मला सुदधा उत्तर सापडतील त्या प्रश्नाची. निर्णय घेताना सगळं स्वच्छ दिसत होता , बरोबर वाटतं होता, आणि नंतर धुक्यातून चालताना अंदाज बांधत वाट चाचपडल्यासारखा. बाहेर पडण्याचा निर्णय सोप्पं नव्हता. माझी नोकरी जेमतेम होती , नवीन होती, फार income नव्हतं. त्यात अविनाश खूप well settled होता so त्या life style शी सवय होती , तुला आणि मला सुद्धा. बाहेरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तोच घ्यायचा, मला विशेष लक्ष घालयला लागायचा नाही finance मध्ये. बाहेर पडताना माझ्या हातात दोनच गोष्टी होत्या , भोवरातून बाहेर पडून खळखळत्या प्रहावत पुढे जायची इच्छा आणि तुझा इटुकल बोट. मी तुला घेवून बाहेर पडले , स्वतंत्र घरी. न अविनाश च्या , न सचिन च्या. मला सचिन आवडतो हे माहित होतं सगळ्यांना , अविनाश , त्याच्या घराचे आणि माझ्या आई बाबांना सुद्धा. आई-बाबांनी चक्क पाठ फिरवली माझ्याकडे.एवढ्या चांगल्या घरातला , शिकलेला , well settled नवरा सोडून देण हा शुद्ध वेडेपणा होता त्यांच्या दृष्टीने. त्यांनी माझा निर्णय फक्त आवडला नव्हता , त्यांचा विरोध होता ह्या सगळ्याला. सुजाला अजिबात तडजोड नको आहे असा शिक्का मारला त्यांनी. त्यांना वाटलं कि सुप्पोर्त नाही केला , तुला सांभाळायला मदत नाही केली , तर कदाचित परत जाईल अविनाश कडे. त्यांच्या जागी कदाचित ते बरोबर होते. त्यात माझ्या night शिफ्ट मुळे त्या वर्षात माझी जास्त सवय राह्हिली नव्हती तुला.आजोबांची प्रचंड सवय. त्यांना आवडायचा नाही हां तुला रागावलेला अजिबात आणि तू एक नम्बेरचा हट्टी ! घर डोक्यावर घ्यायचास काही मिळालं नाही तर. आजोबा म्हणायचे " अविनाश लहानपणी असाच होता" J त्यांची फार माया होती तुंझ्यावर.
नवीन घर , नवीन जागा. बाबा नाही , आजोबा नाहीत. तुझा वय हे कळण्याचा कि काहीतरी गडबड आहे , पण का आणि काय आहे हे कसा समजावून सांगणार होते मी तुला. मी दुर्लक्ष केला , स्वतःला समजावलं कि सवयी बदलतात , नवीन लागतात. तू रूळशील. पण night शिफ्ट मुळे मला तुला daycare मधेही ठेवता येईना. काही मैत्रिणीची मदत घेतली महिना दोन महिने.
परिस्तिथी बदलत नव्हती. फासे हवे तसे पडत नव्हते. Divorce ची procedure चालू झाली होती. मी एक च्नागली आई नाही हे सिद्ध कारण फार अवघड जाणार नव्हतं अविनाश ला. मी मला पैश्याने झेपेल तसाच वकील घेतला होता. त्यानेहि मला custody चा issue बद्दल अंधारात नव्हतं ठेवल. अविनाश हट्टी होता , तेच वाद्याचा मला कधी काळी त्याच्याबद्दल. त्याने अट घातली , तुझी custody surrender केली तर तो मला mutual consent नि divorce देणार म्हणाला.
तू हुशार होतास , तुझा शिक्षण माझ्यासाठी महत्वाच होत.तुला च्नागली life style मिळण महत्वाचा होत. तुला हवा तसा वेळ देणारी माणस नव्हती माझ्याकडे. आजोबा तुला कधी अंतर देणार नाहीत याची मला खात्री होती. तिकडे तुला मी देऊ शकेन त्यापेक्षा जास्त मिळेल आणि तू आनंदी राहशील असं सतत वाटत होत.
काही नसलं न माणसाकडे आयुष्यात तरी चालेल , पण स्वतःवर विश्वास हवा. तोच नेमका नव्हता माझ्याकडे. तुझ्या चांगल्यासाठी मी मनावर दगड ठेवला आणि तो निर्णय घेतला.
मी पळवाट काढली असा वाटल तुला तर ते चुकीचा नाही , मलाही नंतर कित्येकदा अस वाटलंय.

अक्षय    : बरोबर , आनंदी तर आहेच न मी बाबाच्या घरी. We are a happy family. बाबाच्या घरी मला सगळं मिळालं , तू आणि आजोबा सोडून.
(pause, दोघेही विचार करत आहेत.)
सुमित्रा    : आजोबा ?
अक्षय    : Mumma चा पटल नाही त्यांच्या बरोबरआजोबा लाड करायचे आणि mumma ची कडक शिस्त. आणि बाबा एक दृष्टीने आजीआजोबाना कारणीभूत धरतो तुमच्या divorce बद्दल
सुमित्रा    : hmmmm. स्वतःच्या वागण्याचं आणि चुकांचं ओझं पेलत नाही ना , तेंवा तो भार आणखी कुणावर टाकल्याशिवाय पुढ जाताच नाही येत. अविनाश ने आजीआजोबांवर टाकला , आणि मी परिस्थितीवर.
अक्षय     : mumma बाबाच्या लग्नाआधी आजोबाच होते. बाबाने स्वताला कामात बुडवून घेतलं होता , खूप उशिरा यायचा आणि सकाळी लवकर जायचा. सुरुवातीला बाबा आणि तुला दोघानाही मिस करायचो, पण आजोबा असायचे नेहमी. माझ्यासाठी स्वयंपाक सुद्धा करायचे. माझे आई बाबा सगळ तेच होते.
नंतर mumma पण सोडून जाईल या भीतीने मी त्याला भेटायचा हट्ट नाही केला. पण मी त्यांना खूप मिस करतो. मला कसातरी होतं त्यांना भेटला कि. मी त्यांना धोका दिल्यासारखा...
सुमित्रा    : आयुष्यात ऋणानुबंध तसे असतात कधी कधी. तुझे आणि अमृताचे नाहीत का. तसच. But I am happy that you turned out to be a good boy !
अक्षय    : good boy होतो का झालो काय माहित. मूळचा कसा होतो तुलाच माहित. बाबा तर माझ्या लहापणीचा काही बोलताच नाही जास्त. mumma वर माझी चांगली आई बनण्याचं दडपण असावा बहुतेक. माझ्याकडून नेहमीच तिच्या खूप अपेक्षा असतात. अनु कडून जेवढ्या नाहीत तेवढ्या. तुअझ्यासमोर म्हणून नाही सांगत , पण आजकाल मला असा अनेकदा वाटलंय , माझ्याकडे ती तिचा मुलगा म्हणून बघते कि social work चा प्रोजेक्ट ?
I was never a kid who can have myrid fractures of his own personality for her. मी हुशार आणि गुणी मुलगा बनलो कि ती एक च्नागली आई बनेल असा काहीतरी समीकरण बनवला आहे तिने. मग त्यात मला चुका कार्याची संधी होतीच कुठे.
मी जो काही आहे तो तिच्यामुळेच ह्यात शंका नाही. पण आई होताना ती कुठे तरी हे विसरली कि मी "मी" आहे किंवा होवू शकलो असतो.
सुमित्रा    : नाती आणि मानसं अशी काळी किंवा पाढरी नसतात. तिने जे केल त्या चुका कदाचित मीही केल्या असत्या.ती माझं द्वेष करते म्हणून ती तुझी आई म्हणून वाईट आहे असा मी नाही म्हणणार.
माणसांकडे असा एकाच चष्म्यातून नको बघूस. बिचारी, दुष्ट , चांगली , वाईट , स्वार्थी , प्रेमळ अश्या categories बनवू नयेत. या सगळ्याच combination असतात.
सगळे रंग बघायला चष्मा नाही लोलक - prism लागतो. तो कधीही हरवू नकोस.
अक्षय    : mumma बाबा तुला भेटू द्यायचे नाहीत का मला ?
सुमित्रा    : सुरुवातीला यायचे मी. मग अविनाश सांगायचा कि तू मला भेटून परत गेलास कि बोलत नाहीस जास्त , एकलकोंडा होतोस , मी परत कधी येणार विचारात राहतोस. तुझी द्विधा मनस्थिती मला हि जाणवायची. माझ्यामुळ अमृता आणि तुझ्या नात्यात अंतर पडत होता असा अविनाश चा मत होत. आता माझ्यापेक्षा अमृता तुझ्या आयुष्याचा मोठा हिस्सा होती हे स्वीकारणं अवघड होता मला पण इलाज नव्हता. त्या नात्यात अंतर पडणं हि माझ्या एक दिवसाच्या आईपणासाठी फार मोठी किंमत होती.
(pause)
अक्षय    : आणि मग मला तुझा जास्तच राग येत गेला. अजूनही येतो कधी कधी. बाबा mumma म्हणतात त्यांनी जे केलं ते माझ्या भल्यासाठी केलं, तू हि तेच म्हणतेस , तरीही मला असं का वाटतंय कि तुम्ही सगळ्यांनी माझा विचारच नाही केला या सगळ्यात. मला काय हवा होत ते कुणी विचारलाच नाही मला कधी.
सुमित्रा: सगळेच चुकलो.
(pause)
नीरजा    : uncle नि ८ च्या आत परत यायला सांगितला होतं , we need to leave.
सुमित्रा    : किती वाजले ?
अक्षय    : ७:३० झाले , निघतो आता.
सुमित्रा    : अक्षय , तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुला मिळाली असतील असा नाही , पण माझं ऐकून घेतलस यातच मला सगळं मिळालं. तुझ्या हक्काचा प्रत्येक क्षण मी नाही देऊ शकत परत , पण त्या प्रत्येक क्षणी तुझी आई न होता येण्याची खंत सतत होती माझ्याबरोबर सावलीसारखी.
अक्षय    : ( बघतो पण काहीच बोलत नाही).
नीरजा    : अक्षय , निघुयात का ?
सुमित्रा    : हो निघा. आणि गाडी सावकाश चालवा बर का. नीरजा मला पलेअसे कळवशील पोचलीस कि ? (नीरजा बाहेर जाते. अक्षय दारापाशी जातो. चपला घालतो)
अक्षय    : (सवयीप्रमाणे सहज बोलतो) येतो.
सुमित्रा    : ये मी वाट पाहीन.

(अक्षय चमकून बघतो आणि बाहेर पडतो.)

प्रसंग ८ :

नीरजा    : मी चालवते गाडी
अक्षय    : का ?
नीरजा    : तुझा डोक्यात प्रचंड विचार आहेत . ( किल्ली काढून घेते हातातून).
अक्षय    : hmmm
नीरजा    : काय ठरवलंस मग तू ? बोल न माझ्याशी , बर वाटेल तुला. मोकळं कर जरा मन. रस्ताभर एकही शब्द बोलला नाही आहेस.
अक्षय    : अग ठरवायचं काय त्यात. काय courtcase चा निकाल लावयला आलो नव्हतो. काय बोलू कळत नाहीये कुठून सुरुवात करू. इतका गुंता झालाय कि तो सोडवायला एक टोक सापडायला हवा न दोरीच , तेच नेमकं सापडत नाहीये.
नीरजा    : प्रयत्न कर , सापडेल.
अक्षय    : सगळी उत्तर नाही मिळाली , rather ती मिळतील अशी अपेक्षाहि नव्हती. रागहि पूर्ण गेला असं नाही.
नीरजा    : अरे ११ वर्षांचा राग , २ तासात कसा जाईल अक्क्या.
अक्षय    : तिथे जायच्या आधी मला काय वाटत होता सांगू ?
नीरजा    : काय
अक्षय    : आईने मला उडवाउडवीची , थातूर मातुर , मनाला न पटणारी उत्तरं द्यावीत.
नीरजा    : मला वाटलं तुला खरा जाणून घ्यायच होतं.
अक्षय    : sometimes we just want our version of truth to be true rather than knowing the actual truth. Because that's comforting, it assures that you were right all along. I wanted a her to fail, I just wanted her to admit her fault. I wanted her to be a bad mother. I wanted her to justify my hatred for her. मी फार स्वार्थी आहे का गं ?
नीरजा    : स्वतःचा विचार करण्यात नेहमी स्वार्थ असेल असा नाही , मला तरी सुमित्रा aunty न भेटून असाच वाटलं. मला कळतंय कि तुला त्या चूक आणि अविनाश काका बरोबर असा सरळ सरळ निकाल हवा आहे किंवा कदाचित उलट. पण अक्क्या मोठं झालं कि subjective प्रश्न जास्त महत्वाचे होतात objective पेक्षा.
अक्षय    : डोकं फुटून जाईल विचार करून करून माझं. सगळ्यांनी स्वतःपुरत ठरवलंय कोण कस आहे ते. लोकांनी आईला निर्दयी ठरवलं मला सोडून गेली म्हणून. तिच्यावर बाबाने शिक्का मारला कि सुमित्रा ने affair केलं , मुलाला सोडलं आणि काय तर दूसरा संसार थाटला. पण मग बाबा ने तरी काय केलं ? त्यानेही माझी जबाबदारी mumma वर टाकलीच कि. त्याने सुद्धा mumma वर प्रेम केलच कि. आई ला खंत आहे कि बाबाने मला तिच्यापासून दूर ठेवला , पण ती कमी पडलीच तिच्या हक्कासांठी भांडण्यात. तिच्या guilt ची शिक्षा घेतली तिने स्वतःला बर वाटावं म्हणून.mumma तर बिचारी सतत सगळ्यांचे टोमणे खायची. ती कडक शिस्तीची म्हणून मी सारखा धाकात. तिच्यावर माझी perfect mom बनायचं pressure नसतं तर किती बर झाल असतं. तिने फार सोसलंय आयुष्यात बाबा ला भेटायच्या आधी.
बाबा hero वाटतो सगळ्यांना , पण आई गेल्यानंतर आजोबाच होते माझ्यापाशी. बाबा त्याच्या विश्वात होता. आई परत यायची जेवढी वाट नाही बघाय्चू तेवढी बाबा office मधून परत यायची वाट बघायचो मी.
आई कशी चुकीची आणि बाबा कस बरोबर , mumma कशी great हेच बघत आलो मी आणि आता गोंधळून गेलोय.
नीरजा    : दिसतं त्या पलीकडच पाहणं फार दमणूक करणार आहे. सुमित्रा aunty म्हणाल्या न कि you should try to look at people through the prism , then only you will see the shades. And not all the shades are going be of happy colors, some of them are going to be darker.
अक्षय    : त्या सगळ्यांना समोरची व्यक्ती चुकीची वाटतीये , त्यांना सगळ्यांना असा वाटतंय कि त्यांनी जे केला ते माझ्या चांगल्यासाठी केलं. त्यांना सगळ्यांना तया सगळ्यात स्वतःचा बळी गेलाय असा वाटतंय. पण माझा विचार करतंय का कुणी ? बाबा आणि mumma ची मी हे सगळं maturedly handle कराव अशी अपेक्षा आहे. आई ला मी तिला माफ करून सहवास द्यावा अशी अपेक्षा आहे. पण यातल्या कुणाला कळत नाहीये का I do not want to make a choice. काय मिळेल आणि choose करून. mumma बाबाची नाराजी , आई चा पडलेला चेहरा.
हे का ते असं सरळ उत्तर कस देऊ मी. I want it all. मी का त्यांनी एकमेकांबद्दल बनवलेल्या चौकटी मधे राहू ? मी माझी नवीन चौकट , नवीन नाती नाही का बनवायची ? त्या माणसात मला have तसे रंग नाही का शोधायचे ?
नीरजा    : अक्क्या , असे एका दिवसात सगळे प्रश्न नाही सुटणार. तुला काही दिवस अविनाश काका आणि अमृता aunty ची नाराजी सहन करावी लागेल. सुमित्रा aunty बरोबर पण सूर जुळायला कदाचित वेळ लागेल. जादूची छडी असती आपल्याकडे तर किती बर झाला असतं नाही.
अक्षय    : जादूच्या छड्या वगैरे वरचा विश्वास ठेवायच्या वयातही मी कधी विश्वास नाही ठेवला त्यावर. आजोबा आजोबा म्हणून चिडवत असतेस तू मला but believe me , I am not like this by choice. Insecurities change you the way you cannot imagine.
नीरजा    : ए अक्क्या, कसा असतास रे तू जर हे सगळं झालंच नसतं तर ?
अक्षय    : कुणास ठाऊक. कदाचित बाबा सारखा हट्टी , आईसारखा creative. भरपूर चुका केल्या असत्या , मार खाल्ला असता. इतका good boy तर नक्की झालो नसतो.
नीरजा    : पण मला आहे तसा पण छानच वाटतोस तू. प्रेमळ , शांत , caring , कुणालाही न दुखावणारा , अति विचार करणारा. माझ्या prism मधून colorful दिसतोस हां तू अक्क्या.. एकदम गोविंदा style.
अक्षय    : तू पण न नीरु. गोविंदा काय !
नीरजा    : हो मग ! लोकांना काही वाटलं तरी स्वतःला आवडणारे स्वतःचे रंग घेवून जगणं सोप्पं नाही.... life is not that complicated , we make it that way. हा सगळा गुंता ठेव बाजूला , पहिल्यांदा स्वताकडे बघ. तुला करायचं न हट्ट , मोडायचे आहेत न नियम , तिथून सुरुवात कर. तो लोलक पहिल्यांदा आरश्यासमोर धर , बाकीच्याचे रंग कळतील हळू हळू पण आधी स्वतःतले तरी शोध.
अक्षय    : तूच ग नीरु तूच ! ठरलं मग.
नीरजा    : काय ?
अक्षय     : घरी जातो. बाबाला सांगतो स्पष्ट कि आई ला भेटत राहीन. mumma ला पण सांगतो कि हा एक हट्ट पुरव माझा. आई ला पण सांगेन कि भेटत राहा मला हक्काने. सगळं सरळ नका करू , पण मला वळणाच्या रस्त्यावर चालू द्या , ठेच लागू द्या , आयुष्यातले रंग माझे मला शोधू द्या. माझं लोलक मला वापरू द्या.
नीरजा    : आता कस बोललास फक्कड ! अक्षय आजोबा , इसी बात पे एक एक भेळ हो जाये. नियम मोडा घरी जेवण्याचा. आज इकडेच उदरंभरणं ! पार्टी दे मला तू.
अक्षय    : तुझा एकच रंग फार strong आहे नीरु , भुक्कड !


--------------------------------------------------------------------समाप्त -------------------------------------------------------------